पावसाचा फटका, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आजही विशेष ब्लॉग!
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दरड कोसळल्याने आजही या मार्गावर विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. दोन तासांचा हा विशेष ब्लॉक घेण्यात आला असून दुपारी चार वाजल्यापासून हा ब्लॉक घेण्यात आला आहे.
मुंबई, 28 जुलै 2023 | मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दरड कोसळल्याने आजही या मार्गावर विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. दोन तासांचा हा विशेष ब्लॉक घेण्यात आला असून दुपारी चार वाजल्यापासून हा ब्लॉक घेण्यात आला आहे. घाट मार्गातील धोकादायक दरडी हटवण्याचं काम या ब्लॉक दरम्यान केलं जाणार आहे. मुंबईकडे जाणारी वाहतुक त्यामुळे किवळेपासून पुढे वळवण्यात आली आहे. कालही या मार्गावर दोन तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात आला होता, आणि आजही दोन तासाचा ब्लॉक घेण्यात आला आहे. सहा दिवसात या मार्गावर तीन वेळी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.
Published on: Jul 28, 2023 03:19 PM
Latest Videos