Special Report | गुढी पाडव्यापासून सर्व निर्बंध हटणार, मास्क सक्ती नाही, मास्क ऐच्छिक -tv9

Special Report | गुढी पाडव्यापासून सर्व निर्बंध हटणार, मास्क सक्ती नाही, मास्क ऐच्छिक -tv9

| Updated on: Apr 01, 2022 | 8:36 PM

महाराष्ट्र सरकारनं कोरोना निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मार्च 2020 मध्ये घालण्यात आलेले निर्बंध हळू हळू शिथील कऱण्यात येत होते. मात्र आता दोन वर्षांनंतर निर्बंध शिथील करण्यात आले आहेत.

मुंबई : महाराष्ट्र सरकारनं कोरोना निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मार्च 2020 मध्ये घालण्यात आलेले निर्बंध हळू हळू शिथील कऱण्यात येत होते. मात्र आता दोन वर्षांनंतर निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. या निर्णयामुळं गुढीपाडवा मिरवणुका जोरात काढण्यात येणार आहेत. तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात येणार आहे. तर, रमझान ईद देखील साजरी करण्यास प्रतिबंध असणार नाहीत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.राज्यातील सर्व निर्बंध उठवण्यात आलेले आहेत. सर्वांनी आपले सण आनंदात साजरे करावेत. गुढीपाडवा, रमझान ईद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि इस्टर डे उत्साहात साजरा करावा, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

Published on: Mar 31, 2022 09:20 PM