Special Report | एसटी प्रशासन प्रवाशांच्या जीवाशी खेळतंय ?

Special Report | एसटी प्रशासन प्रवाशांच्या जीवाशी खेळतंय ?

| Updated on: Jan 08, 2022 | 10:59 PM

स्वारगेट आगारातून अखेर लालपरी बाहेर पडल्याने महामंडळ व एसटी कर्मचाऱ्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला नसला तरी करार तत्वावरील खासगी चालकांच्या मदतीने एसटी सेवा सुरु करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला.  त्यानुसार आगारातून आज पाहिली एसटी बाहेर पडली. मात्र आंदोलक कर्मचाऱ्यांनी आक्रमक होत आगार बाहेर पडत असलेली एसटी अडवत कर्मचाऱ्यांनी गोंधळ घातला.

पुण्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्याप मिटलेला नाही. जोपर्यंत राज्य शासनात विलीनीकरण नाही तोपर्यंत माघार नाही अशी भूमिका स्वारगेट आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. दुसरीकडं स्वारगेट आगारातून अखेर लालपरी बाहेर पडल्याने महामंडळ व एसटी कर्मचाऱ्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला नसला तरी करार तत्वावरील खासगी चालकांच्या मदतीने एसटी सेवा सुरु करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला.  त्यानुसार आगारातून आज पाहिली एसटी बाहेर पडली. मात्र आंदोलक कर्मचाऱ्यांनी आक्रमक होत आगार बाहेर पडत असलेली एसटी अडवत कर्मचाऱ्यांनी गोंधळ घातला. एसटी आगार बाहेर काढली जात आहेत असे म्हणताच कर्मचारी आगारात जमा झाले.  त्यांनी आगारातच ठिय्या आंदोलन करत सरकारचा निषेध केला.

बाहेरचे चालक आणवून एसटी गाड्या बाहेर काढल्या जात असल्याचा आरोप आंदोलक कर्मचाऱ्यांनी केला आहे. बाहेर निघत असलेल्या एसटीच्या समोर बसत कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले. ताणाशाही नही चलेगी म्हणत महामंडळाचा कृतीचा निषेध केला. एसटी कर्मचाऱ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनामुळे पोलिसांची फौज फाटाही तैनात करण्यात आला. ज्या कर्मचाऱ्याकडे चालक आणि वाहक पदाची जबाबदारी त्याच कर्मचाऱ्यांनी एसटी चालवली पाहिजे. कर्मचारी आंदोलन माघार घेत नसल्याने महामंडळाने वर्क शॉपमधील कर्मचाऱ्यांच्या मदतीने एसटी चालवली जात असल्याचा आरोप आंदोलकी कर्मचाऱ्यांनी केला आहे.