Special Report | बाजी पलटली, संजय राठोडांचा चित्रा वाघांनाच इशारा-TV9
आपलं राजकीय करिअर संपवण्याचा प्रयत्न झाला असून, क्लीनचिटची कागदपत्र चित्रा ताईंना पाठवणार असल्याचंही राठोड म्हणालेत. पुणे पोलिसांनी संजय राठोडांना जी क्लीन चिट दिली, त्यावरच चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतलाय.
संजय राठोडांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये पुन्हा मंत्री केलं…आणि भाजपमधून चित्रा वाघ यांनी तीव्र विरोध केला. तरुणीच्या आत्महत्येला राठोडच जबाबदार असून, त्यांना पुन्हा मंत्री करणं दुर्दैवी असल्याचं चित्रा वाघ म्हणाल्या…त्यावर राठोड आता माध्यमांसमोर आलेत…पुणे पोलिसांनीच आपल्याला क्लीन चिट दिल्यानं शिंदे-फडणवीसांनी पुन्हा संधी दिल्याचं राठोड म्हणतायत. गेल्या वर्षी बीडच्या तरुणीनं पुण्यात आत्महत्या केली…त्यानंतर काही ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्या होत्या. त्या आत्महत्येचं कनेक्शन संजय राठोडांशी जोडून चित्रा वाघ यांनी आरोप केले..त्यामुळं राठोडांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र आपलं राजकीय करिअर संपवण्याचा प्रयत्न झाला असून, क्लीनचिटची कागदपत्र चित्रा ताईंना पाठवणार असल्याचंही राठोड म्हणालेत. पुणे पोलिसांनी संजय राठोडांना जी क्लीन चिट दिली, त्यावरच चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतलाय…मात्र आता यापुढे आरोप केले तर कायदेशीर कारवाई करणार, असा इशाराच राठोडांनी चित्रा वाघ यांना दिलाय…