Special Report | UPमध्ये निकालाचा बार, Maharashtra मध्ये सरकार पडणार ? -tv9
गेल्या दोन वर्षापासून ठाकरे सरकार पडण्याचे अनेक मुहूर्त भाजपकडून काढण्यात आले आहेत. भाजपने काही दिवसांपूर्वीच आता पुन्हा नवा मुहूर्त काढला. ठाकरे सरकार हे दहा मार्चनंतर पडेल असे भाजप नेत्यांकडून सागण्यात येत आहे. मात्र चंद्रकांत पाटलांच्या या विधानाची राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी खिल्ली उडवली आहे.
सातारा : गेल्या दोन वर्षापासून ठाकरे सरकार पडण्याचे अनेक मुहूर्त भाजपकडून काढण्यात आले आहेत. भाजपने काही दिवसांपूर्वीच आता पुन्हा नवा मुहूर्त काढला. ठाकरे सरकार हे दहा मार्चनंतर पडेल असे भाजप नेत्यांकडून सागण्यात येत आहे. मात्र चंद्रकांत पाटलांच्या या विधानाची राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी खिल्ली उडवली आहे. भाजपाने महविकास आघाडी सरकार पडण्याचा मुहूर्त काढणारा नेता बदलावा असा टोला देसाईंनी पाटलांनी लगावला आहे. आघाडी सरकार स्थापनेपासून दोन वर्षात भाजपाने अनेक मुहूर्त सांगितले. मात्र सरकार इंचभरही हलले नाही आणि येथून पुढेही हलणार नसल्याचा विश्वास शंभुराज देसाई यांनी व्यक्त केला आहे.