Special Report | राणा दाम्पत्यांच्या निशाण्यावर ठाकरे सरकार, दिल्लीत तक्रार-TV9
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना थेट आव्हान दिल्यानंतर, नवनीत राणा दिल्लीत आल्यात. दिल्लीत येताच नवनीत राणांनी सर्वात आधी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्लांची भेट घेतली आणि ठाकरे सरकारकडून झालेली कारवाई तसंच पोलीस कोठडीतल्या वागणुकीवरुन लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना थेट आव्हान दिल्यानंतर, नवनीत राणा दिल्लीत आल्यात. दिल्लीत येताच नवनीत राणांनी सर्वात आधी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्लांची भेट घेतली आणि ठाकरे सरकारकडून झालेली कारवाई तसंच पोलीस कोठडीतल्या वागणुकीवरुन लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केली. पोलीस कोठडीत पाणी आणि चटई सुद्धा दिली नाही. पोलिसांनी हीन वागणूक दिल्याची तक्रार नवनीत राणांनी कोठडीत असतानाच पत्राद्वारे लोकसभा अध्यक्षांकडे केली होती..त्यानंतर खार पोलीस स्टेशनमध्ये राणा दाम्पत्य चहा पित असल्याचा व्हिडीओ पोलीस आयुक्त संजय पांडेंनीच ट्विट केला होता. मात्र सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्ये आपल्यासोबत गैरवर्तणूक केल्याचा आरोप नवनीत राणांनी केलाय..आता प्रत्यक्ष भेटून राणांनी लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केली. यानंतर नवनीत राणा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहेत.