Special Report | Karnatakaनंतर पश्चिम बंगालमध्ये हिजाबवरुन वाद – tv9

| Updated on: Feb 13, 2022 | 9:43 PM

कर्नाटकातील हिजाब वादाचे लोण राज्या राज्यांमध्ये पसरलेले असतानाच आता या वादात एमआयएमचे नेते असद्दुदीन ओवैसी यांनी उडी घेतली आहे. इंशा अल्लाह, एक दिवस एक हिजाबी पंतप्रधान होईल, असं ओवैसी यांनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली: कर्नाटकातील हिजाब वादाचे लोण राज्या राज्यांमध्ये पसरलेले असतानाच आता या वादात एमआयएमचे नेते असद्दुदीन ओवैसी यांनी उडी घेतली आहे. इंशा अल्लाह, एक दिवस एक हिजाबी पंतप्रधान होईल, असं ओवैसी यांनी म्हटलं आहे. ओवैसी यांनी ट्विट करून हिजाब वादावर ही प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, हिजाबचा वाद केवळ कर्नाटकपर्यंत मर्यादित राहिला नाही. महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटत आहेत. राज्यातील अनेक भागात निदर्शने करण्यात आली आहेत. काही ठिकाणी हिजाब डेही पाळण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील हिजाबच्या विक्रीतही मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. तसेच पश्चिम बंगालमध्येही हिजाबच्या आंदोलनावेळी लाठीमार करण्यात आला. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्याने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

Special Report | कथित कोव्हिड घोटाळ्यावरुन राजकारण तापलं -tv9
Special Report | कॉंग्रेसचा राष्ट्रवादीला ‘दे धक्का’! -tv9