Special Report | पवनपुत्र हनुमान नेमके कुठले ‘भूमी’पूत्र? नाशिकमध्ये शास्त्रार्थ सभेत साधू-महंतांमध्ये मानापमान नाट्य!
नाशिकमधील एका महंतांनी जगतगुरु शंकराचार्य यांना उल्लेख काँग्रेसी असा केला आणि त्यानंतर वादाला तोंड फुटलं. शंकराचार्यांची माफी मागावी, अशी आक्रमक मागणी त्यानंतर लावून धरण्यात आली. तत्पूर्वी आसनव्यवस्थेवरुनही हे साधू-महंत एकमेकांसमोर उभे ठाकल्याचं पाहायला मिळालं.
हनुमानाच्या जन्मस्थळावरुन सुरु झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी नाशिकमध्ये शास्त्रार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. पण या शास्त्रार्थ सभेत मारुतीराया बाजुलाच राहिला आणि साधु-महंत आपसांत भिडल्याचं चित्र पाहायला मिळालं. नाशिकमधील एका महंतांनी जगतगुरु शंकराचार्य यांना उल्लेख काँग्रेसी असा केला आणि त्यानंतर वादाला तोंड फुटलं. शंकराचार्यांची माफी मागावी, अशी आक्रमक मागणी त्यानंतर लावून धरण्यात आली. तत्पूर्वी आसनव्यवस्थेवरुनही हे साधू-महंत एकमेकांसमोर उभे ठाकल्याचं पाहायला मिळालं.
शास्त्रार्थ सभा सुरु झाल्यानंतर नाशिकमधील महंतांनी जगद्गुरु शंकराचार्य यांचा काँग्रेसी असा उल्लेख केल्याचा आरोप करण्यात आला. इतकंच नाही तर महंत सुधीरदास महाराज यांनी महंत गोविंददास महाराज यांच्यावर माईकही उगारला. त्यानंतर मात्र, शास्त्रार्थ सभेत मोठा राडा पाहायला मिळाला. जगद्गुरुंचा अपमान केल्याप्रकरणी महंत सुधीरदास यांनी माफी मागावी अशी आक्रमक मागणी करण्यात आलीय. त्यानंतर शास्त्रार्थ सभेत मोठा राजा पाहायला मिळाला.