Special Report | Gunaratna Sadavarte यांना 11 एप्रिलपर्यत पोलीस कोठडी-tv9

Special Report | Gunaratna Sadavarte यांना 11 एप्रिलपर्यत पोलीस कोठडी-tv9

| Updated on: Apr 09, 2022 | 9:00 PM

शरद पवारांच्या घरावरील हल्ला प्रकरणात सदावर्तेंना थेट पोलीस कोठडीत जावं लागलंय. सदावर्तेंनी चिथावणी दिल्यानंच एसटीच्या संपकऱ्यांनी हल्ला केल्याचा आरोप पोलिसांनी केलाय. अटकेनंतर सदावर्तेंना कोर्टात हजर करण्यात आलं, त्यानंतर कोर्टानं सदावर्तेंना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

शरद पवारांच्या घरावरील हल्ला प्रकरणात सदावर्तेंना थेट पोलीस कोठडीत जावं लागलंय. सदावर्तेंनी चिथावणी दिल्यानंच एसटीच्या संपकऱ्यांनी हल्ला केल्याचा आरोप पोलिसांनी केलाय. अटकेनंतर सदावर्तेंना कोर्टात हजर करण्यात आलं, त्यानंतर कोर्टानं सदावर्तेंना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. गुणरत्न सदावर्ते 12 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत असतील. तर 109 एसटी कर्मचाऱ्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. या 109 कर्मचाऱ्यांचा जामीन अर्ज किल्ला कोर्टानं फेटाळला असून सत्र न्यायालयात जाण्याचा सल्ला किल्ला कोर्टानं दिलाय. सदावर्तेंनी आपल्या मारहाण झाली असून अंगावर जखमा असल्याची तक्रार केली. त्यानंतर सदावर्तेंच्या शरिराची स्वत: न्यायमूर्तींनी पाहणी केली पण जखमा आढळल्या नाहीत. तर सदावर्तेंना पोलीस कोठडीत त्यांच्या औषधी देण्याची परवानगी दिलीय.