Special Report | भाजपच्या नजरेत अपक्ष, आणि मविआचे मित्र पक्ष? -tv9

Special Report | भाजपच्या नजरेत अपक्ष, आणि मविआचे मित्र पक्ष? -tv9

| Updated on: May 31, 2022 | 9:04 PM

शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपच्या धनंजय महाडिकांमध्ये थेट लढत आहे. महाडिक माघार घेणार नाही, हे भाजप ठासून सांगतेय...तर स्वत: देवेंद्र फडणवीस काही आमदार आम्हाला सदसद् विवेकबुद्धीनं मतदान करणार असल्याचं वारंवार सांगतायत

राज्यसभेच्या 6 व्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपच्या धनंजय महाडिकांमध्ये थेट लढत आहे. महाडिक माघार घेणार नाही, हे भाजप ठासून सांगतेय…तर स्वत: देवेंद्र फडणवीस काही आमदार आम्हाला सदसद् विवेकबुद्धीनं मतदान करणार असल्याचं वारंवार सांगतायत…त्यामुळं भाजप मोठा उलटफेर करणार का ? अशी चर्चा सुरु झालीय.. धनंजय महाडिकांच्या एंट्रीनं 6 जागेसाठी एकूण 7 उमेदवार झालेत. त्यामुळं घोडेबाजार होणार हे निश्चित आहे. आणि यात अपक्षांसह लहान पक्ष महत्वाची भूमिका बजावतील…अपक्ष एकूण 13 आमदार आहेत. या 13 पैकी महाविकास आघाडीच्या बाजूनं 7 अपक्ष आहेत. तर 8 आमदार भाजपच्या बाजूनं आहेत. तसंच मनसेचा 1 आमदार आहे आणि MIMचे 2 आमदार आहेत. त्यामुळं मनसे आणि MIM कोणाच्या बाजूनं मतदान करतात हेही महत्वाचं आहे.

Published on: May 31, 2022 09:04 PM