Special Report | महाविकास आघाडीच्या उमेदवारीनं संभाजीराजेंचा विजय मार्ग सोप्पा?-TV9
राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी पाठिंब्याची मागणी देखील केली. मात्र शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरच पाठिंबा देण्याची अट खुद्द मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजेंना घातल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीय...
स्वराज्य संघटनेची स्थापना करत छत्रपती संभाजीराजेंनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढण्याची घोषणा केली खरी, मात्र राजेंसमोर पाठिंब्याचा मोठा पेच निर्माण झालाय. राष्ट्रवादी वगळता कोणत्याच पक्षानं संभाजीराजेंना पाठिंबा दिलेला नाही. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संभाजीराजेंना शिवसेनेत प्रवेश करण्याची ऑफर देत पेच आणखीच वाढवलाय. संभाजीराजेंनी गुरूवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी पाठिंब्याची मागणी देखील केली. मात्र शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरच पाठिंबा देण्याची अट खुद्द मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजेंना घातल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीय…
संभाजीराजे-मुख्यमंत्री बैठकीत काय घडलं?-सूत्र
1. संभाजीराजेंनी अपक्ष उमेदवारीला पाठिंबा देण्याची मागणी केली
2. मात्र मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजेंना शिवसेनेत प्रवेश करण्याची ऑफर दिली
3. शिवसेनेत प्रवेश केल्यास राज्यसभेची उमेदवारी देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी दिला
4. यावर संभाजीराजेंनी शिवसेनेची नाहीत तर मविआची उमेदवारी देण्याचा नवा प्रस्ताव दिला
5. मविआची उमेदवारी मिळाली तरी राज्यसभेत सेनेच्या खासदारांसोबत असण्याची अट मुख्यमंत्र्यांनी घातली
6. राज्यसभेत शिवसेनेच्या धोरणात्मक निर्णायावर संभाजीराजेंनी सोबत राहण्याची अटही घालण्यात आली
7. राज्यसभेतील विधेयकं, राजकिय निर्णयात संभाजीराजे शिवसेनेसोबत असतील अशीही अट घालण्यात आली
भाजपची कोंडी करण्यासाठी शिवसेनेनं राजेंना पक्षप्रवेशाच्या ऑफरची खेळी केल्याची चर्चा आहे…. त्याच वेळी भाजपनं देखील संभाजीराजेंच्या पाठिंब्यासंदर्भात सस्पेन्स चांगलाच वाढवलाय…संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून शिवसेना आणि भाजपमध्ये कुरघोड्याचं राजकारण सुरू असतानाच. शरद पवारांनी मात्र संभाजीराजेंना जाहीर पाठिंबा दिलाय…
त्यामुळे जर मविआची उमेदवारी मिळाली तर संभाजीराजेंचा विजय कसा सोप्पा होईल यावर एक नजर टाकूयात…
मविआत संभाजीराजेंच्या विजयाचा मार्ग सोप्पा
1. संभाजीराजेंना निवडून येण्यासाठी 42 मतांची आवश्यकता
2.आपला प्रत्येकी एक उमेदवार निवडून आणून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस मिळून 27 मतं शिल्लक
3. अपक्ष आमरादांची संख्या धरून मविआकडे 46 मतं शिल्लक
4. त्यामुळे मविआत आल्यास संभाजीराजेंचा विजयाचा मार्ग सोप्पा
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांपैकी 2 भाजप, 1 शिवसेना, 1 राष्ट्रवादी, 1 काँग्रेस अशी विजयी खात्री व्यक्त केली जातेय… मात्र 6व्या जागेसाठी संभाजीराजेंच्या दाव्यानं चुरस चांगलीच वाढताना दिसतेय. शिवसेनेची पक्षप्रवेशाची अट, तर राष्ट्रवादीचा खुला पाठिंबा. त्यात भाजपच्या भूमिकेतील सस्पेन्स… यामुळे आता संभाजीराजे राज्यसभेच्या अपक्ष उमेदवारीवर ठाम राहतात… की काही वेगळी भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.