Special Report | अवकाशातून आगीचे गोळे.. ते नक्की काय होतं? -Tv9
शनिवारी बऱ्याच ठिकाणी आकाशातून काहीतरी पडताना दिसलं. या घटनेमुळे नागरिकांच्या मनात भीती आणि उत्सुकता पाहायला मिळतेय. राज्यात वाशिम, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, उस्मानाबाद, लातूर अशा विविध भागातील नागरिकांना आकाशातून काहीतरी पडताना पाहायला मिळालं.
शनिवारी बऱ्याच ठिकाणी आकाशातून काहीतरी पडताना दिसलं. या घटनेमुळे नागरिकांच्या मनात भीती आणि उत्सुकता पाहायला मिळतेय. राज्यात वाशिम, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, उस्मानाबाद, लातूर अशा विविध भागातील नागरिकांना आकाशातून काहीतरी पडताना पाहायला मिळालं. वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील वाघेडा ढोक येथे शेतात सॅटेलाईटचे अवशेष पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जात हे साहित्य जप्त केले आहे. वाघेडा ढोक शिवारातील नितीन सोरटे यांच्या शेतात सकाळी त्यांना एक सिलिंडरच्या आकाराची वस्तू शेतकऱ्याच्या नजरेस पडल्याची माहिती समोर आली आहे. फक्त त्यांच्याच नाही, तर राज्यात अनेक ठिकाणी उत्तर महाराष्ट्रासहीत अनेक ठिकाणी अशा घटना समोर आल्या आहेत. हे काय होतं त्यांचा शोध मात्र अद्याप ठोसपणे लागू शकला नाही.