Special Report | राणा दाम्पत्य V/s शिवसेना पुन्हा संघर्ष-TV9
मातोश्रीच्या नादाला लागाल तर 20 फूट खड्ड्यात गाडू असा इशारा संजय राऊतांनी राणांना दिला होता. यावर प्रत्युत्तर देताना नवनीत राणांनी राऊत म्हणजे मातोश्रीचा पोपट अशी टीका केली. ज्या पद्धतीने नवनीत राणांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि ठाकरेंना आव्हान दिलंय, ते पाहता येत्या काळात राणा विरुद्ध ठाकरे पुन्हा एकदा नवा संघर्ष पेटणार हेच दिसतंय.
लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच खासदार नवनीत राणांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर पुन्हा एकदा तोफ डागली. लीलावती रुग्णालयाच्या दारातूनच नवनीत राणांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रातल्या कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं. मात्र राणांना प्रत्युत्तर देताना सेनेच्या पेडणेकरांनी थेट लायकीचा शब्द वापरला. मुंबई पालिकेत शिवसेनेच्या भ्रष्टाचाराची लंका संपवण्यासाठी शिवसेनेविरोधात प्रचार करण्याचा इशारा नवनीत राणांनी दिला तर राणांना शिवसेनाच ठिकाणावर आणेल असं प्रत्युत्तर किशोरी पेडणेकरांनी दिलंय.रुग्णालयातला MRI टेस्ट करतानाचा नवनीत राणांचा फोटो व्हायरल झालाय. या फोटोंवरच बोट ठेवत किशोरी पेडणेकरांनी नवनीत राणांवर निशाणा साधला…तर नवनीत राणा देशातल्या वाढत्या महागाईवर का बोलत नाहीत असा सवालही पेडणेकरांनी विचारलाय.
मातोश्रीच्या नादाला लागाल तर 20 फूट खड्ड्यात गाडू असा इशारा संजय राऊतांनी राणांना दिला होता. यावर प्रत्युत्तर देताना नवनीत राणांनी राऊत म्हणजे मातोश्रीचा पोपट
अशी टीका केली. ज्या पद्धतीने नवनीत राणांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि ठाकरेंना आव्हान दिलंय, ते पाहता येत्या काळात राणा विरुद्ध ठाकरे पुन्हा एकदा नवा संघर्ष पेटणार हेच दिसतंय.