Special Report | राणे-केसरकर वाद वाढला, शिंदे गट-भाजप, सरकारचं अशानं कसं होईल?-tv9
निलेश राणेंनी लायकी काढल्यानंतर केसरकरांनीही त्यांची लायकी काढली. त्यानंतर पुन्हा निलेश राणेंनी केसरकरांवर बोचरी टीका केलीय.
शिंदे-फडणवीस सरकारला 15 दिवस आहेत..आणि कोकणातल्या नेत्यांमध्ये खटके वाजण्यास सुरुवात झालीय. शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर आणि निलेश राणे एकमेकांची लायकी काढतायत. सुरुवात केसरकरांच्या एका प्रतिक्रियेपासून झाली. राणेंचे लहान लहान मुलं ट्विट करतात त्याकडे लक्ष देत नाही, असं केसरकर म्हणाले. याच प्रतिक्रियेवर निलेश राणेंनी ट्विट करुन जळजळीत पलटवार केला. दीपक केसरकर इज्जत मिळते तर ती घ्यायला शिका. लायकी पेक्षा जास्त बोलू नका. 25 दिवसांपूर्वी तुम्ही किती लहान होतात हे विसरु नका. पण प्रकरण इथंच थांबलं नाही. निलेश राणेंनी लायकी काढल्यानंतर केसरकरांनीही त्यांची लायकी काढली. त्यानंतर पुन्हा निलेश राणेंनी केसरकरांवर बोचरी टीका केलीय.
Published on: Jul 14, 2022 10:38 PM
Latest Videos