Special Report | राज ठाकरेंपुढे भूमिकांच्या 'धर्म'संकटाचा नवा पेच?-TV9

Special Report | राज ठाकरेंपुढे भूमिकांच्या ‘धर्म’संकटाचा नवा पेच?-TV9

| Updated on: May 10, 2022 | 9:33 PM

भाजपचे खासदार ब्रृजभूषण सिंह यांनी बोलावलेल्या धर्मसंसदेत राज ठाकरेंना विरोध करण्यावर शिक्कामोर्तब झालं. उत्तर भारतीय, तसंच उत्तर प्रदेशातल्या साधू संतांची माफी न मागता राज ठाकरे अयोध्येत आल्यास..5 लाख उत्तर भारतीय विरोध करणार, असा निर्णयच उत्तर प्रदेशातल्या धर्मसंसदेत झाला.

भाजपचे खासदार ब्रृजभूषण सिंह यांनी बोलावलेल्या धर्मसंसदेत राज ठाकरेंना विरोध करण्यावर शिक्कामोर्तब झालं. उत्तर भारतीय, तसंच उत्तर प्रदेशातल्या साधू संतांची माफी न मागता राज ठाकरे अयोध्येत आल्यास..5 लाख उत्तर भारतीय विरोध करणार, असा निर्णयच उत्तर प्रदेशातल्या धर्मसंसदेत झाला. ब्रृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना विरोध करण्यासाठी अयोध्येतल्या साधू संतांनाही एकत्र आणलंय..त्यामुळं अयोध्येत यायचं असेल तर संधीचं सोनं करुन राज ठाकरेंनी माफी मागावी, असं ब्रृजभूषण म्हणतायत. अयोध्येतल्या संसदेत 50 हजारांची गर्दी होईल, असा दावा ब्रृजभूषण यांनी आधीच केला होता..आणि प्रत्यक्ष धर्मसंसदेतही राज ठाकरेंच्या विरोधासाठी प्रचंड गर्दी जमली. राज ठाकरेंना विरोध करण्यासाठी अयोध्येतले साधूही आक्रमक आहेत.

या धर्मसंसदेच्याआधी ब्रृजभूषण सिंह यांनी, जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. नवाबगंज ते नंदिनीनगर पर्यंत ब्रृजभूषण यांनी रॅली काढली…या रॅलीतही ब्रृजभूषण समर्थकांची मोठी गर्दी झाली…आणि रॅलीतूनही राज ठाकरेंना ब्रृजभूषण सिंहांना आव्हान दिलं. ब्रृजभूषण सिंहांनी, अयोध्येसह आजूबाजूच्या परिसरात राज ठाकरेंच्या विरोधात वातावरण निर्मिती केलीय. त्यामुळं यूपीतल्या महिला असो साधू आणि सर्वसामान्य जनता, राज ठाकरेंच्या माफीवर ठाम आहेत. ब्रृजभूषण सिंहही माफीची मागणी करण्याबरोबरच राज ठाकरेंवर विखारी शब्दात टीकाही करतायत. 5 जूनला राज ठाकरे अयोध्येत जाणार आहेत. मात्र आधी एक ब्रजभूषण विरोधात होते. आणि विरोधाच्या आवाजाची गर्दी वाढलीय.

Published on: May 10, 2022 09:33 PM