Special Report | शिवसेनेपासून दुरावलेल्या रामदास कदम यांचा शिवसेनेच्या नेत्यांवर हल्लाबोल
शिवसेनेपासून काहीसे दुरावलेले आमदार रामदास कदमांनी आज शिवसेना नेत्यांवरच हल्लाबोल केला. मुद्दा होता खेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचा. खेडेकरांनी एका गावात बौद्धवाडीच्या नावानं पूल बांधल्याचा आरोप केला आणि त्यावरुन शिवसेना नेते आणि गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाईंवर प्रश्नांची सरबत्ती केली.

सभागृहात येण्याआधी सुद्धा रामदास कदमांना विधानभवनाच्या गेटवरच अडवलं गेलं. कारण, कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल कदमांकडे नव्हता… कोरोना चाचणीचा अहवाल नसल्यामुळे पोलीस रामदास कदमांना आत सोडायला तयार नव्हते. त्यामुळे रामदास कदम प्रचंड वैतागले. कदमांनी सुरक्षारक्षकासोबत
वादही घालून बघितला. विधानभवनाच्या गेटबाहेर कदमांनी फोनाफोनीही करुन बघितली. अखेर एकनाथ शिंदे कदमांच्या मदतीला धावले. शेवटी कदमांची अँटीजेन चाचणी केली गेली. त्यानंतर रामदास कदम सभागृहात पोहोचले.