Special Report | राज कुंद्रा यांची पॉर्न फिल्ममधून रोज 10 लाखांची कमाई?
एक्स्क्लुझिव्ह बँक डिटेल्सनुसार राज कुंद्रा आणि त्यांची कंपनी दिवसाला 1 ते 10 लाख रुपये कमवत होते. त्यांच्या बँक अकाऊंटवर रोज लाखो रुपये जमा होत असल्याचं बँक डिटेल्सवरुन उजेडात आलं आहे.
राज कुंद्रा यांच्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्यातीलच एक म्हणजे त्यांच्या खात्यात रोज होणारं लाखो रुपयांचं डिपॉझिट! राज कुंद्रा यांचे काही बँक डिटेल्स हाती लागले आहेत. त्यात Hotshots डिजिटल प्लॅटफॉर्मवर अश्लील चित्रपट टाकून राज कुंद्रा यांच्या खात्यात रोज किती रुपये जमा होत होते याची हैराण करुन सोडणारी आकडेवारी समोर आली आहे. हाती लागलेल्या एक्स्क्लुझिव्ह बँक डिटेल्सनुसार राज कुंद्रा आणि त्यांची कंपनी दिवसाला 1 ते 10 लाख रुपये कमवत होते. त्यांच्या बँक अकाऊंटवर रोज लाखो रुपये जमा होत असल्याचं बँक डिटेल्सवरुन उजेडात आलं आहे. ही रोजची आकडे लाखो रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे या उद्योगातून राज कुंद्रा हे किती रुपयांची कमाई करत होते, याचा अंदाज बांधणही कठीण आहे.
Latest Videos