Special Report | नेत्यांबरोबरच सेलिब्रिटींमागे कोरोनाचं ग्रहण !
बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींना गाठल्यानंतर आता गाणसम्राज्ञी लता मंगेशकरांनाही कोरोनाची लागण झालीय. कोरोनामुळेच त्यांना निमोनिया सुद्धा झाल्याची माहिती आहे. मंगेशकरांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयातल्या आयसीयू कक्षात दाखल केलं गेलंय. त्यांना कोरोनाची सौम्यलक्षणं असली, तरी लता मंगेशकरांचं वय आता 92 आहे. त्यात कोरोनामुळे त्यांना निमोनियाची बाधा झाल्यानं त्यांना आयसीयू कक्षात भर्ती करण्यात आल्याची माहिती आहे.

ओमिक्रॉनच्या लाटेत मागच्या काही दिवसात नेत्यांनंतर सर्वाधिक बाधित होण्याचं प्रमाण सेलिब्रिटींचं आहे. आतापर्यंत अभिनेता हृतिक रोशन, त्याची पहिली पत्नी सुजान खान, जॉन अब्राहम, प्रेम चोप्रा, नोरा फतेही, एकता कपूर, दृष्टी धामी, कट्टपाची भूमिका साकारणारे अभिनेते सत्यराज, मधुर भंडारकर, स्वरा भास्कर, विशाल डडलानी, प्रतीक बब्बरसह अनेकांना कोरोनाची लागण झालीय. नेत्यांमध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनाही कोरोना झालाय. महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 13 मंत्री आणि जवळपास 70 आमदारांना कोरोनाची लागण झालीय.