Special Report | Udayanraje यांच्याबद्दल Gunratna Sadavarte नेमकं काय बोलले होते? -Tv9
वकील गुणरत्न सदावर्तेंमागे चौकशीचा फेरा घट्ट होत चाललाय. मुंबई पोलिसांनंतर आता सातारा पोलिसांना सदावर्तेंचा ताबा हवाय. दोन वर्षांपूर्वी सदावर्तेंनी उदयनराजेंबद्दल एक विधान केलं होतं. त्या विधानावर दाखल असलेल्या गुन्ह्यावरुन सदावर्तेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
वकील गुणरत्न सदावर्तेंमागे चौकशीचा फेरा घट्ट होत चाललाय. मुंबई पोलिसांनंतर आता सातारा पोलिसांना सदावर्तेंचा ताबा हवाय. दोन वर्षांपूर्वी सदावर्तेंनी उदयनराजेंबद्दल एक विधान केलं होतं. त्या विधानावर दाखल असलेल्या गुन्ह्यावरुन सदावर्तेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. खासदार उदयनराजेंबद्दल वापरलेल्या आक्षेपार्ह विधानावरुन सातारा पोलीस सदावर्तेंच्या चौकशीसाठी मुंबईत पोहोचलेत. म्हणजे यापुढच्या काही दिवसात सदावर्तेंना पवारांच्या घरावर हल्ल्याप्रकरणी जरी जामीन मिळाला, तरी उदयनराजेंबद्ददल केलेल्या विधानावरच्या गुन्ह्यांबाबत त्यांची अटकेची शक्यता आहे. साताऱ्यात 2020 मध्ये म्हणजे दोन वर्षांपूर्वी सदावर्तेंवर गुन्हा दाखल होता. मराठा मोर्चा आणि त्यासंदर्भातल्या चर्चांवरुन टीव्ही कार्यक्रमात सदावर्तेंनी उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपतींबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याची तक्रार एका व्यक्तीनं दिली. आणि त्यावरुन आता सातारा पोलिसांना सदावर्तेंचा ताबा हवाय.