Special Report | Sharad Pawar यांच्या घरावरील हल्ल्यामागे कोण?-tv9
शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यानंतर, राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झालेत...या हल्ल्यामागे भाजपचाच हात असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला..तर राष्ट्रवादीकडील गृहखातं आपल्याकडे घेण्यासाठी शिवसेनेनंच हल्ला घडवल्याचं, मुनगंटीवार म्हणालेत..
शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यानंतर, राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झालेत…या हल्ल्यामागे भाजपचाच हात असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला..तर राष्ट्रवादीकडील गृहखातं आपल्याकडे घेण्यासाठी शिवसेनेनंच हल्ला घडवल्याचं, मुनगंटीवार म्हणालेत..त्यामुळं हल्ल्यामागील सूत्रधारावरुनच राजकारण तापलंय. भाजपचे आमदार नितेश राणेंनी तर राऊत आणि मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेच्या बैठकीचं, या हल्ल्याशी कनेक्शन का ?, असा सवाल करुन खळबळ उडवलीय. पवारांच्या घरावर जो हल्ला झाला, त्यावरुन अजित पवारांनीही पोलिसांवर जाहीरपणे नाराजी व्यक्त केलीच आहे…आणि आता तोच धागा पकडत गोपीचंद पडळकरांनीही, सरकारचेचे काही जण या हल्ल्यात सहभागी आहेत का ?, असा सवाल पडळकरांनी केलाय. इतर इकडे काँग्रेसनंही भाजपवर निशाणा साधला. एसटी कामगारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपनंच हल्ला केल्याचा आरोप पटोलेंनी केलाय.