अनावधानाने बोललो, सर्वांची माफी मागतो; बंडातात्या कराडकरांची जाहीर दिलगीरी
भाजप नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule and Pankaja Munde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्या विरोधात कीर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनी वादग्रस्त विधान केलं होतं.
भाजप नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule and Pankaja Munde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्या विरोधात कीर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण राज्यात त्याचे पडसाद उमटल्यानंतर आज अखेर बंडातात्या कराडकर यांनी माफी मागितली आहे. बाळासाहेबांच्या बरोबर मी ज्या लोकांबद्दल नाव घेतली. त्यांच्याबद्दल माझ्या मनात आकस नाही किंवा त्यांचा द्वेष करत नाही. राजकीय हेतूने हे आरोप केले नाहीत. ज्या चार लोकांवर मी आरोप केले त्यांचीच नव्हे तर इतर लोकांचीही माफी मागत आहे. माझं विधान अनावधानाने झालं आहे. त्याबद्दल मी क्षमा मागत आहे, असं बंडातात्या कराडकर यांनी सांगितलं. पोलीस त्यांची ड्युटी करतील. त्यांना आदेश आहेत त्याप्रमाणे ते मला ताब्यात घेतील. आम्ही अटक करून घेऊ, असंही कराडकर यांनी सांगितलं.