गोविंदांना मिळणार सरकारी नोकरीत प्राधान्य? दहीहंडी सणानिमित्त राज्य सरकारची नियमावली काय?

| Updated on: Sep 05, 2023 | 3:23 PM

VIDEO | राज्यातील ७५ हजार गोविंदांना विमा कवच देण्याचा राज्य शासनाचा निर्णय अन्... दहीहंडी सणानिमित्त राज्य सरकारची नियमावली काय? गोविंदा उत्सव आनंदात पार पडावा यासाठीच्या समन्वय समितीकडे सूचना

मुंबई, ५ सप्टेंबर २०२३ | गोविंदा या खेळाचा समावेश नुकताच साहसी खेळात करण्यात आला आहे. त्यासोबतच मृत अथवा जखमी होणाऱ्या गोविंदांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासोबतच यंदा पहिल्यांदाच राज्यातील ७५ हजार गोविंदांना विमा कवच देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. एवढच नव्हे तर दहीहंडीच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, गोविंदा सणानिमित्त राज्य सरकारची नियमावली क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले, गोविंदा उत्सव आनंदात पार पडावा यासाठीच्या सुचना आम्ही समन्वय समितीला दिल्या आहे. सरकारच्या सुचनाचे पालन करण्याची जबाबदारी ही गोविंदाची असेल. नियमांचे पालन न करणाऱ्या गोविंदांवर कारवाईचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. तर इतर खेळांप्रमाने उत्कृष्ट गोविंदाना देखील सरकारी नोकरीत प्राधान्य देण्यात येणार आहे.

Published on: Sep 05, 2023 03:23 PM