बळीराजा, सामान्य माणूसाच्या सुखासाठी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची देवीकडे प्रार्थना
राज्यावर येणारी सर्व संकटं, आपत्ती दूर व्हाव्यात, बळीराजा, सामान्य माणूस यांच्या आयुष्यात सुख येवो, राज्य सुजलाम सुखलाम होवो अशी प्रार्थना केल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं
ठाणे : श्रीरामजन्मोत्सव, रामनवमीचा उत्साह देशभरात पहायला मिळत आहे. राज्यातही विविध ठिकाणी मंदिरांमध्ये भाविकांची गर्दीही पाहायला मिळत आहे. यावेळी बाविक देवदर्शन करून मांगल्याची कामना करताना दिसत आहेत. तर ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानाकडून चैत्र नवरात्रउत्सवचा आयोजन करण्यात आलं होतं. याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आयोजन करण्यात आले आहे. यावेळी नवरात्रउत्सवचा शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवीचा 108 परिक्रमा केल्या. तसेच देवीचा पूजा अर्चना करत राज्याचं भलं व्हावं याच्यासाठी प्रार्थना देवीच्या चरणी केलं.
सगळीकडे भक्तिभावाने उत्साहाने उत्सव साजरा होत आहे. गेल्या दोन वर्ष मर्यादा होत्या. परंतु या वर्षी जल्लोश, उत्साह हा जोरात पाहायला मिळत आहे. सर्व देवी भक्त दर्शनाला येत आहे कार्यक्रमात सहभागी होत आहेत असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. तर राज्यावर येणारी सर्व संकटं, आपत्ती दूर व्हाव्यात, बळीराजा, सामान्य माणूस यांच्या आयुष्यात सुख येवो, राज्य सुजलाम सुखलाम होवो अशी प्रार्थना केल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं