ST विलीनीकरणासंदर्भात त्रिसदस्यीय समितीने कोर्टात अहवाल सादर केलाय, अनिल परब यांची माहिती
आज पुन्हा एसटीच्या विलीकरणाच्या (St Merger) सुनावणीला कोर्टाने पुढची तारीख दिली आहे. त्यामुळे आजही एसटी कर्मचाऱ्यांची निराशा झाली आहे.
मुंबई : आज पुन्हा एसटीच्या विलीकरणाच्या (St Merger) सुनावणीला कोर्टाने पुढची तारीख दिली आहे. त्यामुळे आजही एसटी कर्मचाऱ्यांची निराशा झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एसटीच्या विलीनीकरणाचा (St Worker Strike) मुद्दा तापला आहे. हे प्रकरण कोर्टात आहे. उच्च न्यायालयामध्ये आज समितीचा निर्णय हा वाचण्यात आला आहे आणि त्या समितीच्या निर्णयाचे पत्र कर्मचाऱ्यांच्या वकिलांना देण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिली आहे.