गुणरत्न सदावर्तेंच्या कार्यक्रमात पुन्हा झळकला नथुराम गोडसेचा फोटो अन् अखंड भारताचे पोस्टर्सही
गेल्या काही दिवसापासून नथुराम गोडसे यांच्या फोटोमुळे अधिक चर्चेत आहेत. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर नथुराम गोडसे यांचा फोटो ही लावला होता. त्यानंतर यावरून चांगलीच टीका झाली होती.
सोलापूर : एसटी कामगारांचे नेते गुणरत्न सदावर्ते काही ना काही कारणाने चर्चेत असतात. ते आपल्या वादग्रस्त विधानांमुळे अधिक चर्चेत असतात. मात्र यावेळी ते गेल्या काही दिवसापासून नथुराम गोडसे यांच्या फोटोमुळे अधिक चर्चेत आहेत. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर नथुराम गोडसे यांचा फोटो ही लावला होता. त्यानंतर यावरून चांगलीच टीका झाली होती. यानंतर आता पुन्हा एकदा राजकीय वातावरण गरम होण्याची शक्यता आहे. कारण सदावर्ते यांच्या सोलापूर येथील कार्यक्रमात पुन्हा एकदा नथुराम गोडसे यांचा फोटो झळकला आहे. इतकचं नाही तर यावेळी अखंड भारताचे पोस्टर्सही झळकले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सदावर्ते यांच्यावर विरोधकांना टीका करण्याची संधी चालून आली आहे.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

