…आणि हीच खरी बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली ठरेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना 97 व्या जयंतीनिमित्त केले अभिवादन
बाळासाहेब ठाकरे यांची आज 97 वी जयंती असून हा 23 जानेवारी हा दिवस सर्वच शिवसैनिकांसाठी महत्त्वाचा, आनंदाचा दिवस आहे. या दिवशी सर्वसामान्य लोकांच्या हिताचे लोकाभिमुख कार्यक्रमांचे आयोजन आज केले जाते. सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे काम बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून करण्यात आले आहेत, असे म्हणत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले.
पुढे एकनाथ शिंदे म्हणाले, 80 समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हा मूलमंत्र बाळासाहेब ठाकरे यांनी दिला. बाळासाहेबांच्या विचारधारेवरच सर्वसामान्यांचं सरकार स्थापन झाले आहे. गेल्या 5-6 महिन्यात बाळासाहेबांना अभिप्रेत असणारे सर्वसामान्य जनतेच्या हितासाठीचे निर्णय या सरकारने घेतले. सर्वांना आपलं वाटणारं सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे. या राज्यातील सर्वसामान्य माणूस, समाज घटक यांच्या जीवनात आनंदाचे दिवस आले पाहिजे, अशी भावना बाळासाहेबांची होती, त्या विचारांची भूमिका शिंदे-फडणवीस सरकार पुढे घेऊन जात असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.