उद्धव ठाकरे यांच्याकडे लिमिडेट डिक्शनरी, त्यातील शब्द ते फिरवून वापरता; देवेंद्र फडणवीस यांची खोचक टीका

| Updated on: Feb 21, 2023 | 2:58 PM

VIDEO | इतकं निराश होऊन मनात येऊल ते बोलायचं यातून त्यांच्या बुद्धीची कीव लोकांना येते, देवेंद्र फडणवीस यांचा निशाणा नेमका कुणावर?

पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्याने ठाकरे गटात खळबळ उडाली. यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळवण्यासाठी २००० कोटी रूपयांचा सौदा झाल्याचा गंभीर आरोप केला. यासंदर्भात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राजकारणात कधी वर जातो कधी खाली जातो, पण इतकं निराश होऊन मनात जे येईल काही बोलायचं, यातून लोकं त्यांच्या बुद्धीची कीव करतात. त्यांच्या बोलण्याने काहीच परिणाम होत नाही. तसंच संजय राऊत जे बोलले ते निर्बुद्धपणे बोलतात, अशा निर्बुद्ध लोकांना काय उत्तर देणार? असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलताना फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्याकडे लिमिडेट डिक्शनरी आहे आणि त्यातीलच ते शब्द फिरवून फिरवून वापरत असतात असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.

Published on: Feb 21, 2023 02:58 PM
MPSC विद्यार्थ्यांवर आंदोलनाची वेळ का आली? काँग्रेसच नेत्यांचा सरकारला सवाल
श्रीकांत शिंदे यांनी मला मारण्याची सुपारी दिली- संजय राऊत