Shoumika Mahadik आगामी लोकसभा निवडणूक लढवायला तयार?
VIDEO | लोकसभा निवडणूक लढवणार? भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष शौमिका महाडिक स्पष्टच म्हणाले, 'पक्षाने संधी दिली तर कुटुंब आणि लोकांच्या जोरावर आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची आपली तयारी असेल, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं'
कोल्हापूर, ३० ऑगस्ट २०२३ | पक्षाने संधी दिली तर कुटुंब आणि लोकांच्या जोरावर आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची आपली तयारी असेल, असं सूचक वक्तव्य भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष शौमिका महाडिक यांनी केलं आहे. काही दिवसांपूर्वीच राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी महाडिक कुटुंबाची लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर शौमिका महाडिक यांनी केलेल्या वक्तव्याने आता चर्चेला उधाण आलं आहे. गोकुळ दूध संघातील विरोधी आघाडीच्या संचालिका असलेल्या शौमिका महाडिक या भाजप महिला आघाडीतील एक आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांना कोल्हापूर किंवा हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच शक्यतेबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी सूचक शब्दात आपली तयारी दर्शवली आहे. दरम्यान स्त्री म्हणून राजकीय क्षेत्रात काम करताना मोठ्या अडचणी येत असल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे.