Cyclone Biparjoy : राज्यातल्या किनारपट्टींना अलर्ट! रत्नागिरी-गणपतीत समुद्राचे पाणी थेट दुकानांत? कशाचा परिणाम?
समुद्राचे पाणी अचानक चौपाटीवरील दुकानांत घुसल्याने तर पर्यटकांचे समुद्र किनारी ठेवले साहित्यही वाहून गेले. त्यामुळे येथे एकच खळबळ उडाली आहे. तर विशेषबाब म्हणजे समुद्राचे पाणी गणपतीपुळे मंदिराच्या पायऱ्यांपाशी पोहोचले होते. त्यामुळे गणपतीपुळे समुद्रात नक्की काय घडतय काय हालचाली सुरू आहेत, अशा शंका अनेकांच्या मनात काहूर करत आहेत.
रत्नागिरी : रत्नागिरीतील गणपतीपुळे येथे समुद्रातील पाण्याच्या पातळीत अचानक वाढ पाहायला मिळत आहे. समुद्राचे पाणी अचानक चौपाटीवरील दुकानांत घुसल्याने तर पर्यटकांचे समुद्र किनारी ठेवले साहित्यही वाहून गेले. त्यामुळे येथे एकच खळबळ उडाली आहे. तर विशेषबाब म्हणजे समुद्राचे पाणी गणपतीपुळे मंदिराच्या पायऱ्यांपाशी पोहोचले होते. त्यामुळे गणपतीपुळे समुद्रात नक्की काय घडतय काय हालचाली सुरू आहेत, अशा शंका अनेकांच्या मनात काहूर करत आहेत. हे सगळ बिपरजॉय चक्रीवादळामुळे पहायला मिळत आहे. येथे समुद्रातील अंतरप्रवाह बदलल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान, दोन दिवसांपासून समुद्राला प्रचंड उधाण आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनानं त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. तर किनारपट्टी भागामध्ये खबरदारी देखील घेतली जातेय. जिल्हा प्रशासनानं त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना देखील जारी केल्यायत. बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने राज्यातल्या किनारपट्टी भागामध्ये अलर्ट जारी केला आहे.