आता तरी त्यांचा न्यायालयावरील विश्वास वाढेल, दसरा मेळाव्याच्या निकालावरून मुनगंटीवारांचा शिवसेनेला टोला
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला जोरदार टोला लगावला आहे. दसरा मेळाव्याचा निकाल शिवसेनेच्या बाजुने लागला, यावरून त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधाला आहे.
मुंबई : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी शिवसेनेला (Shiv Sena) जोरदार टोला लगावला आहे. दसरा मेळाव्याचा निकाल शिवसेनेच्या बाजुने लागला. उच्च न्यायालयाने (High Court) शिवसेनेचा युक्तिवाद ऐकल्यानंतर शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली. यावरून आता सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. काही नेत्यांकडून कायमच न्यायालयाच्या भूमिकेवर संशय घेतला जातो. मात्र यावेळी निकाल त्यांच्या बाजुने लागला आहे. अपेक्षा करूयात की आता तरी त्यांचा न्यायालयावरील विश्वास वाढेल असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवाजी पार्कवर कोणाचा दसरा मेळावा होणार शिंदे गट की शिवसेना यावरून राज्याचं राजकारण तापलं होतं. मात्र उच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता शिवाजी पार्कवर शिवसेनेचाच दसरा मेळावा होणार हे स्पष्ट झालं आहे.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

