राष्ट्रवादीत आलबेल म्हणजे शरद पवार यांचा अजितदादा आणि महायुतीला पाठिंबा; भाजप नेत्याचं मोठं विधान

“राष्ट्रवादीत आलबेल म्हणजे शरद पवार यांचा अजितदादा आणि महायुतीला पाठिंबा”; भाजप नेत्याचं मोठं विधान

| Updated on: Aug 09, 2023 | 9:10 AM

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भात मोठं विधान केलं आहे.

मुंबई, 09 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेना-भाजपच्या सरकारला समर्थन दिलं. त्यानंतर राष्ट्रवादीत मोठी फुट पडली. पक्षात अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट निर्माण झाले. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीचा वाद केंद्रीय आयोगाकडे जावून पोहोचला आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध आहे. पक्षात दोन गट नाहीत, शिवाय कोणताही वाद नाही,’ अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मांडल्याची माहिती आहे. शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे चर्चांणा उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, “ते जर असं म्हणत असतील की राष्ट्रवादीमध्ये सर्व आलबेल आहे तर ते अजितदादांना आणि महायुतीला अप्रत्यक्ष पणे समर्थन देत आहेत.”

Published on: Aug 09, 2023 09:10 AM