देशमुख हत्या प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री, ज्याच्या सांगण्यावरून सरपंचांनी घुलेला मारहाण केली, कोण आहे सुग्रीव कराड?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता सुग्रीव कराडची एन्ट्री झाली. सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुख यांनी घुलेला मारहाण केली, असा आरोपी जयराम चाटे आणि महेश केदारनं जबाबाात म्हटले. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण आलंय.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता सुग्रीव कराडची एन्ट्री झाली आहे. आरोपी जयराम चाटे आणि महेश केदारच्या जबाबात सुग्रीव कराडच्या नावाचा उल्लेख आला आहे. सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुख यांनी सुदर्शन घुलेला मारहाण केली, असा जबाब आरोपी जयराम चाटे आणि महेश केदारनं दिला. सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून सुदर्शन घुलेला संतोष देशमुखांनी मारहाण केली. मारहाणीमुळे घुले आणि वाल्मिक कराडची बदनामी झाली. बदला घेण्यासाठी संतोष देशमुखला धडा शिकवायचा असे फरार आरोपी आंधळेनं सांगितलं. त्यातून संतोष देशमुखांची मारहाण करून हत्या करण्यात आली. आरोपी जयराम चाटे आणि महेश केदारच्या जबाबात खंडणीचा उल्लेख नाही.
जयराम चाटे आणि महेश केदारच्या जबाबाात आलेला सुग्रीव कराड हा केज मधला रहिवासी आहे. सुग्रीव कराड हा केज मधील स्थानिक गुंड असल्याची माहिती मिळते. आमदार धनंजय मुंडे आणि कराड सोबत त्यांनी काम केलंय. लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणेंना त्याने विरोध केला होता. विरोधानंतर खासदार बजरंग सोनवणे यांचं नेतृत्व मान्य केल्याची चर्चा आहे. पंचायत समितीच्या निवडणुकीत आईला निवडून आणलं होतं. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा

पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा

'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी

सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा
