Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 4.30 PM | 1 November 2021
मी अतिशय सरळमार्गाने चालणारा आणि नैतिकतेला धरून चालणारा व्यक्ती आहे. गेल्या 30 वर्षात माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनात माझ्यावर एकही आरोप झाला नाही, असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

अनिल देशमुख आज ईडी कार्यालयात हजर झाले. त्यापूर्वी त्यांनी दोन व्हिडीओ पोस्ट करून आपलं म्हणणं मांडलं आहे. मी सरळमार्गाने चालणारा आणि नैतिकतेला धरून चालणारा व्यक्ती आहे. 30 वर्षात माझ्यावर एकही आरोप झाला नाही. राजकीय आणि सामाजिक जीवनात एकदाही आरोप झाला नाही. पण आज सिंग देश सोडून पळू गेले, वाझे तुरुंगात आहेत, या लोकांनीच माझ्यावर केलेल्या आरोपाची ईडी आणि सीबीआय चौकशी करत आहे. याचं मला अतिशय दु:ख आहे, अशी सल देशमुख यांनी व्यक्त केली.