100 SuperFast News | मोदींच्या नावाने निवडणुकीला सामोर जा ठाकरेंच भाजपला आवाहान

100 SuperFast News | मोदींच्या नावाने निवडणुकीला सामोर जा ठाकरेंच भाजपला आवाहान

| Updated on: Mar 27, 2023 | 8:54 AM

ठाकरेंपासून कोणी शिवसेना तोडू शकत नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघात केला. तसेच निवडणुका घ्या, मोदींच्या नावाने सामोर जा असे आवाहान त्यांनी भाजपला केलं आहे.

सुपरफास्ट 100 न्यूज | राहुल गांधी यांच्याकडून होणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर अपमानावर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला इशारा दिला. तसेच राहुल गांधी यांनी भर सभेत इशारा देत, स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचे दैवत आहे. त्यांचा अपमान सहन करणार नाही असं म्हटलं आहे. तर ठाकरेंपासून कोणी शिवसेना तोडू शकत नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघात केला. तसेच निवडणुका घ्या, मोदींच्या नावाने सामोर जा असे आवाहान त्यांनी भाजपला केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील टीका केली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगवा हातात घेऊन गद्दार नाचत होते. खंडोजी खोपड्याची अवलाद, गदाराच्या हातामध्ये भगवा शोभत नाही असा टोला लगावला. खंडोजी खोपड्याची अवलाद या टीकेवर शिवसेना नेते आमदार संजय शिरसाठ यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला. तसेच खंडोजी खोपड्याची कोण अवलाद, कोणी खोके घेतले हे वेळ आल्यावर दाखवून देऊ असे म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघात करताना मोदींच्या नावाने निवडणुकांना सामोर जा म्हटलं होतं. त्यावर आम्ही विकासाच्या नावावर लढतो. आमच्या मध्ये कोणालाही वडील मुख्यमंत्री आणि मुलगा पर्यावरण मंत्री असे सरकार आम्हाला चालवायचं नाही असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरेयांना लगावला.

Published on: Mar 27, 2023 08:54 AM