पहा नवे अपडेट, नव्या बातम्या सुपरफास्ट 50 न्यूजमध्ये
भास्कर जाधव यांच्या चिपळून येथील घरावर हल्ला केल्याप्रकरणी निलेश राणेंवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर दगडफेक करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यानंतर याबाबत भास्कर जाधव यांनी आपली सुरक्षा काढून घेतल्यानंतर असा हल्ला झाला आहे. तर सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय हा पोलिस विभाग घेऊ शकत नाही. यात राजकीय हस्तक्षेप असल्याचा अरोप जाधव यांनी यावेळी केला आहे. तर भास्कर जाधव यांच्या चिपळून येथील घरावर हल्ला केल्याप्रकरणी निलेश राणेंवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. तर यादरम्यान अमरावतीत आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात चांगलीच जुंपल्याचे पहायला मिळत आहे. यावेळी आमदार रवी राणा यांनी कडू यांच्यावर टीका करताना, बच्चू कडू हे सोंगाड्या आहे. तर तोडपाणी करण्यासाठीच ते आंदोलने करतात असेही राणा यांनी म्हटलं आहे.
Published on: Oct 19, 2022 03:07 PM
Latest Videos