काय झालं कालच्या दसरा मेळाव्यानंतर पहा सुपरफास्ट 50 न्यूजमध्ये
आमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी, ठाकरेंचं भाषण संतुलन बिघडल्यासारखं होतं असं म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करेन असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच त्यांनी काल दाखवून दिलं की खरी शिवसेना कोणाची. तर ज्यापद्धतीने बीकेसीवर लोक उपस्थित होते त्यावरून खरी शिवसेना कोणाची हे शिवसैनिकांनी प्रस्थापित करून दिल्याचे फडणवीस म्हणाले. तर यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका देखिल केली आहे. ठाकरेंनी आपला स्क्रिप्ट रायटर बदलावा असा टोला फडणवीस यांनी लगावला. आमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी, ठाकरेंचं भाषण संतुलन बिघडल्यासारखं होतं असं म्हटलं आहे. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दसरा मेळाव्यावरून जहरी टीका केली. शाहीर मनोरंजन करतात तसे मेळावे झाले असे ते म्हणाले. तर मुख्यमंत्री शिंदे यांनी दसरा मेळाव्यात अजित पवार यांच्यावर वेदांतावरून टक्केवारी घेण्याचा आरोप केला होता. त्यानंतर अजित पवार यांनी थेट शिंदे आवाहन देत आरोप सिद्ध करून दाखवा असे म्हटलं आहे.