उद्धव ठाकरे यांच्या गटाला मशाल चिन्ह मिळाल्यानंतर अनेक ठिकाणी रॅली निघाल्या. पहा कोठे निघाल्या या रॅली सुपरफास्ट 50 न्यूजमध्ये
दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या गटाला निवडणूक चिन्ह म्हणून मशाल चिन्ह मिळाल्यानंतर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी रॅली काढण्यात आल्या. मुंबईतील सांताक्रुझ ते शिवाजी पार्क पर्यंत शिवसैनिकांनी मशाल रॅली काढली. तसेच अंधेरी पोटनिवडणूक मशाल या चिन्हाने जिंकूण दाखवू असाही विश्वास कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला.
शिवसेना आणि धनुष्यबाण यांच्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रीया दिली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या बाजूने सहानुभूती मिळत आहे. मात्र त्याचा फायदा त्यांना होणार नसल्याचे म्हटलं आहे. याच वेळी मनसे मुंबई महापालिका निवडणूक ही स्वबळावर लढवणार. तर विजय ही मिळवू असे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. काल उद्धव ठाकरे यांना पक्षासाठी नाव आणि चिन्ह दिल्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला चिन्ह निवडण्याचे आदेश दिले होते. त्यावर शिंदे गट तळपता सुर्य या चिन्हासाठी आग्रही असल्याचे सुत्रांनी माहिती दिली आहे. यासोबतच पिंपळाचं झाडं आणि ढाल याही चिन्हांचा पर्याय आयोगाला शिंदे गटाने दिला आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या गटाला निवडणूक चिन्ह म्हणून मशाल चिन्ह मिळाल्यानंतर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी रॅली काढण्यात आल्या. मुंबईतील सांताक्रुझ ते शिवाजी पार्क पर्यंत शिवसैनिकांनी मशाल रॅली काढली. तसेच अंधेरी पोटनिवडणूक मशाल या चिन्हाने जिंकूण दाखवू असाही विश्वास कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला.