SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 7: 30 AM | 3 July 2021
तिवरे धरण फुटी दुर्घटनेला नुकतंच दोन वर्ष पूर्ण झाली. या दुर्घटनेत घर वाहून गेलेल्या कुटुंबांना हक्काची घर देण्याची घोषणा करण्यात आली होती. तिवरे धरणग्रस्तांसाठी सिद्धीविनायक न्यासाने 5 कोटींचा निधी दिला होता.
संपूर्ण गाव झोपेच्या स्वाधीन होत असतानाच रात्री साडे नऊच्या सुमारास तिवरे धरण फुटलं आणि 21 जणांचा जीव गेला. 2 जुलै 2019 रोजी ही हृदयद्रावक घटना घडली होती. चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटी दुर्घटनेला 2 जुलैला दोन वर्ष पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर दुर्घटनेत घर वाहून गेलेल्यांसाठी सिद्धीविनायक न्यासाने दिलेल्या निधीतून 24 घरांचे लोकार्पण करण्यात आले. मात्र या घरांना मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांनी ही घर ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.
तिवरे धरण फुटी दुर्घटनेला नुकतंच दोन वर्ष पूर्ण झाली. या दुर्घटनेत घर वाहून गेलेल्या कुटुंबांना हक्काची घर देण्याची घोषणा करण्यात आली होती. तिवरे धरणग्रस्तांसाठी सिद्धीविनायक न्यासाने 5 कोटींचा निधी दिला होता. या निधीतून 24 घर बांधण्यात आली होती. काल या घरांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.