Maharashtra Politics : साताऱ्यात दोन राजांचा वाद पेटला; उदयनराजे शिवेंद्र राजे यांचा कार्यक्रमच उधळला
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात शाब्दिक वाद होताना दिसत होते. मात्र आज दोन्ही रोजे आमने सामने आले आणि जोरदार राडा झाला. दोन्ही राजांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यामुळे तेथे तणाव निर्माण झाला होता.
सातारा : साताऱ्यात भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात सध्या जोरदार वाद होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात शाब्दिक वाद होताना दिसत होते. मात्र आज दोन्ही रोजे आमने सामने आले आणि जोरदार राडा झाला. दोन्ही राजांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यामुळे तेथे तणाव निर्माण झाला होता. शिवेंद्रराजे भोसले यांच्या हसते खिंडवाडी गावच्या हद्दीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन जागेचे भूमिपूजन होणार होते. त्यासाठी शिवेंद्रसिंहराजे भोसले कर्यकर्त्यांसह तेथे पोहचले होते. मात्र त्याचवेळी तेथे उदयनराजे हेही कर्यकर्त्यांसह पोहचले यावेळी दोन्ही गटाकडून जागेवर दावा सांगण्यावरून वाद झाला. ज्यानंतर उदयनराजे समर्थकांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा भूमीपूजनाचा कार्यक्रमच उधळून लावला. यावेळी या ठिकाणी असलेलं साहित्य फेकून देत उदयनराजे यांच्या कर्यकर्त्यांनी कंटेनर पलटी केला. यामुळे तेथे तणावाचे वातावरण तयार झाले.