Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाआधीच राऊत याचं खूश करणारं ट्वीट, म्हणाले, झिरवळ… जय महाराष्ट्र!
त्यावरून आता चर्चांना उत आला आहे. यादरम्यान हाय मुद्दा धरत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही याप्रकरणी एक भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आता येत्या काही तासांच्या अंतरावर आहे. सर्वोच्च न्यायलयात याप्रकरणी पाच सदस्यांच्या घटनापीठासमोर सुनावणी पूर्ण झाली असून त्यावर आज निकाल देणार आहे. यावरून राज्यात अनेक तर्कवितर्क लावले जात असतानाच विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) नॉट रिचेबल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यावरून आता चर्चांना उत आला आहे. यादरम्यान हाय मुद्दा धरत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनीही याप्रकरणी एक भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे. काय झाडी, काय डोंगार, सगळं ओक्के आहे, ही शहाजी बापू पाटील यांची टॅगलाईन उचलत त्यांनी ट्विट केलं आहे. ज्यावर जोरदार चर्चा होत आहे. राऊत यांनी काय झाडी ,काय डोंगर, काय हिरवळ, आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ.. जय महाराष्ट्र! असं ट्विट केलं आहे.
Published on: May 11, 2023 10:01 AM
Latest Videos