Special Report | सुप्रीम कोर्टातही राऊतांच्या त्या धमकीचा ऊल्लेख-tv9
आता 12 जुलैकडे शिंदे आणि ठाकरे सरकारचे लक्ष लागून राहिले आहे. न्यायलयाकडून पुढील तारीख देण्यात आली असली तरी आता सुप्रीम कोर्टाकडून शिंदे गटाला तुम्ही सुप्रीम कोर्टात का आला असा सवालही करण्यात आले.
बंडखोरीनंतर विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवाळ यांनी 16 आमदारांना नोटीस पाठवली. या आमदारांना आता 11 जुलैपर्यंत अपात्र करता येणार नाही. त्यामुळे शिंदे गटाला सुप्रीम कोर्टात दिलासा मिळाला. तर शिवसेनेला हा धक्का मानला जातो. शिंदे गटातील 16 आमदारांना झिरवळांनी नोटीस पाठवली असली तरी न्यायालयाकडून मात्र त्यांना दिलासा मिळाला आहे. तर न्यायालयाकडूनही स्थगिती दिली आहे. बंडखोर आमदारांना आपले म्हणणे मांडण्यासाठी 12 जुलैपर्यंत वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे आता 12 जुलैकडे शिंदे आणि ठाकरे सरकारचे लक्ष लागून राहिले आहे. न्यायलयाकडून पुढील तारीख देण्यात आली असली तरी आता सुप्रीम कोर्टाकडून शिंदे गटाला तुम्ही सुप्रीम कोर्टात का आला असा सवालही करण्यात आले.
Published on: Jun 27, 2022 10:40 PM
Latest Videos