Sushma Andhare : बायकोपेक्षा फडणवीस यांच्यावर पहिलं प्रेम म्हणणारा माणूस कुणाचा?; सुषमा अंधारे यांचा सवाल
'शरद पवार यांचा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी असा करतो आणि देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख श्रद्धेय असा करतो. जो डंके की चोटपर सांगतो की, माझी पत्नी जयश्री पाटील असेल तरी माझं पहिलं प्रेम देवेंद्र फडणवीस आहे', सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्या?
पुणे, ८ नोव्हेंबर २०२३ | गुणरत्न सदावर्ते यांच्याबद्दल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मोठं वक्तव्य केले आहे. गुणरत्न सदावर्ते हे भाजप आणि आरएसएसचं माणूस असल्याचे म्हणत सरकारमधील तिघंही फक्त स्वार्थासाठी सत्तेत आहेत. त्यांचा एकमेकांवर विश्वास नाही, अशी सडकून टीकाही सुषमा अंधारे यांनी केली आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या, ‘जो माणूस राष्ट्रीय स्वयम सेवक संघाच्या संचलनामध्ये ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात उपस्थित राहतो, शरद पवार यांचा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी असा करतो आणि देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख श्रद्धेय असा करतो. जो डंके की चोटपर सांगतो की, माझी पत्नी जयश्री पाटील असेल तरी माझं पहिलं प्रेम देवेंद्र फडणवीस आहे. आय लव्ह देवेंद्र फडणवीस असे म्हणतो. तो माणूस भाजपचाच असतो ‘, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी दावा केलाय.

भारत - पाकिस्तानमधल्या डिजीएमओंच्या चर्चेला सुरुवात

भारत-पाकच्या DGMOच्या बैठकीपूर्वी मोदींच्या निवासस्थानी काय झाली चर्चा

इस्त्रोचे 10 उपग्रह बनले लष्कराचे डोळे, दिली पाकच्या हालचालींची महिती

मराठा पर्यटन ट्रेन ९ जूनपासून, 6 दिवसांच्या प्रवासात कुठे फिरता येणार?
