Sushma Andhare : देवेंद्र फडणवीस यांच्या व्हिडीओचं ‘ते’ ट्वीट भाजपकडून अवघ्या ५५ मिनिटांत डिलीट, सुषमा अंधारे म्हणाल्या..
VIDEO | देवेंद्र फडणवीस यांच्या व्हिडीओचं 'ते' ट्वीट भाजपकडून अवघ्या ५५ मिनिटांत डिलीट, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया, दिल्लीवरून फोन आला का? असा सवाल करत असं काय घडल की ट्विट डिलीट करावं लागलं, अशी खोचक टीकाही सुषमा अंधारे यांनी केली
मुंबई, २७ ऑक्टोबर २०२३ | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भाजपकडून एक व्हिडीओ ट्वीट करण्यात आलाय. या व्हिडीओवरून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मात्र नवं महाराष्ट्र नवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईन, असे देवेंद्र फडणवीस बोलत असतानाचा तो जुना व्हिडीओचं ट्वीट भाजपनं अवघ्या ५५ मिनिटात डिलीट केल्याचं ठाकरे गटाचे नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. तर दिल्ली वरून फोन आला का? असा सवाल करत असं काय घडल की ट्विट डिलीट करावं लागलं, अशी खोचक टीकाही सुषमा अंधारे यांनी केली. तर मी कसा पर्याय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांच्या टीमकडून होतोय मात्र राज्यातील परिस्थिती हाताळायला नापास ठरले आहेत हे राज्यातील जनतेला माहिती आहे. तर भाजप देखील नाराज असून भाजपला आवडलेल नसावं म्हणून ते ट्वीट डिलीट केलं असावं असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
Published on: Oct 27, 2023 10:11 PM
Latest Videos