अमित शाह यांचा घराणेशाहीवरून इंडिया आघाडीवर हल्लाबोल, तर विरोधकांचं 'त्या' टीकेला जोरदार प्रत्युत्तर

अमित शाह यांचा घराणेशाहीवरून इंडिया आघाडीवर हल्लाबोल, तर विरोधकांचं ‘त्या’ टीकेला जोरदार प्रत्युत्तर

| Updated on: Feb 19, 2024 | 1:34 PM

भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनातून अमित शाह यांनी इंडिया आघाडीच्या घराणेशाहीवरून सडकून टीका केली आहे. इंडिया आघाडीत कुणाला आपल्या मुलाला पंतप्रधान करायचंय तर कुणाला आपल्या मुलांना मुख्यमंत्री बनवायचंय, असा हल्लाहोल अमित शाह यांनी केलाय.

मुंबई, १९ फेब्रुवारी २०२४ : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. इंडिआ आघाडीतील घराणेशाहीवरून शहांनी निशाणा साधलाय तर यावेळी विरोधकांनी देखील अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केलाय. भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनातून अमित शाह यांनी इंडिया आघाडीच्या घराणेशाहीवरून सडकून टीका केली आहे. इंडिया आघाडीत कुणाला आपल्या मुलाला पंतप्रधान करायचंय तर कुणाला आपल्या मुलांना मुख्यमंत्री बनवायचंय, असा हल्लाहोल अमित शाह यांनी केलाय. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भ्रष्टाचार आणि घराणेशाहीवरून काँग्रेसला धारेवर धरलंय. तर अमित शाह यांना इंडिया आघाडीवर बोलण्याचा कोणताच अधिकार नसल्याचे टीकास्त्र नाना पटोले यांनी डागलंय. तर अमित शाह यांचं पंतप्रधान होण्याचं स्वप्न असल्याचे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी टोला लगावला आहे. इतंकच नाही तर अमित शाह यांनी घराणेशाहीवरून केलेल्या टीकेवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी हल्लाबोल केलाय.

Published on: Feb 19, 2024 01:34 PM