हसन मुश्रीफ यांना महिलांकडून खर्डा भाकरी देऊन भाऊबीज; म्हणाल्या, साहेब फक्त ४०० रूपये…
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. आंदोलनात तोडगा न काढल्याने रस्त्यावर उतरलेल्या शेतक-यांची दिवाळी रस्त्यावर गेली. यामुळे दिपावली भाऊबीजनिमित्त स्वाभिमानी महिला आघाडीच्यावतीने हसन मुश्रीफ यांच्यासह आमदार खासदार लोकप्रतिनिधींना खर्डा भाकरी देवून ओवाळणी
कोल्हापूर, १५ नोव्हेंबर २०२३ | कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह जिल्ह्यातील आमदार, खासदार, साखर कारखान्यांच्या अध्यक्षांना स्वाभिमानी महिला आघाडीच्या वतीने खर्डा भाकरी देण्यात आली. यावेळी महिलांना हसम मश्रीफ यांना महिलांनी भाऊबीजच्या निमित्त खर्डा भाकरी देऊन ओवाळणी केली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सरकार आणि कारखानदारांनी वाऱ्यावर सोडले आहे. आंदोलनात तोडगा न काढल्याने आणि हंगामातील उसाला प्रति टन ४०० रूपये मिळावे या मागणी करता रस्त्यावर उतरलेल्या शेतक-यांची दिवाळी रस्त्यावर गेली. यामुळे दिपावली भाऊबीजनिमित्त स्वाभिमानी महिला आघाडीच्यावतीने आमदार खासदार लोकप्रतिनिधींना खर्डा भाकरी देवून ओवाळणी करण्यात आली. कोल्हापूर जिल्हयाचे पालकमंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना कागल तालुक्यातील महिलांनी खर्डा भाकरी देवून ओवाळणी केल्याचे पाहायला मिळाले.