‘शासन आपल्या दारी’ सरकारच्या योजनेवरून 'या' नेत्याचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

‘शासन आपल्या दारी’ सरकारच्या योजनेवरून ‘या’ नेत्याचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

| Updated on: Jun 13, 2023 | 7:02 AM

VIDEO | ऊस दर नियंत्रण मंडळ स्थापन करायला वेळ नाही, आणि म्हणे गतिमान सरकार, कुणी लगावला खोचक टोला?

कोल्हापूर : शिंदे फडणवीस सरकारकडून ‘शासन आपल्या दारी’ या योजनेच्या प्रसारासाठी वेगळ्या प्रकारे त्याची जाहिरात केली जात आहे. त्यावरूनच स्वाभिमानीचे प्रमुख राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले. राज्यातील अनेक भागात सध्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यासह वेगवेगळ्या जिल्ह्यात मंत्र्याचे दौरे सुरु आहेत. ऊस दर नियंत्रण मंडळ स्थापन करायला वेळ नाही आणि म्हणे हे गतिमान सरकार असल्याचे सांगण्यात येत आहे, असे म्हणत माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका करत राजू शेट्टी म्हणाले की, ‘शासन आपल्या दारी’ ही प्रचारी थाटाची कल्पना आहे. यावेळी त्यांनी म्हटले आहे की, तुम्ही आमच्या दारात आला ठीक आहे पण आमच्या ऊस दरात काय? अनुदानाचं काय? असा सवालही त्यांनी सरकारला उपस्थित केला आहे. राजू शेट्टी यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवरूनही त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले होते.

Published on: Jun 13, 2023 07:02 AM