स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी ‘मविआ’तून लोकसभा लढवणार? उद्धव ठाकरे यांच्या भेटीला मातोश्रीवर दाखल
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले आहेत. राजू शेट्टी हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी पक्षाकडून उभे राहणार? राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून लढावं असा आग्रह शिवसेना ठाकरे गटाचा आग्रह
मुंबई, २ जानेवारी २०२४ : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले आहेत. राजू शेट्टी हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी पक्षाकडून उभे राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर यामध्ये राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून लढावं असा आग्रह शिवसेना ठाकरे गटाचा आग्रह असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. मात्र महाविकास आघाडीत राजू शेट्टी यांना हातकणंगले मधून उमेदवारी देण्यासंदर्भात शिवसेना ठाकरे गट सोडून इतर दोन पक्षाची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. सध्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटात असलेले खासदार धैर्यशील माने हे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे इंडिया आघाडीत समावेशासंदर्भात आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबाबत ही महत्त्वाची बैठक असल्याची माहिती आहे.