Swachhata Hi Seva : एकीकडे स्वच्छता मोहीमेत नेत्यांचा उत्सफुर्त सहभाग तर दुसरीकडे अधिकाऱ्यांनाच घेतलं फैलावर
VIDEO | स्वच्छता मोहिमेवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हाती घेतले झाडू अन् घमेलं, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकरांचा संताप झाला अनावर, थेट अधिकाऱ्यांना झापलं
मुंबई, २ ऑक्टोबर २०२३ | महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशभरात स्वच्छता हिच सेवा हे अभियान राबविण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मंत्री अमित शाह यांच्यासह अनेक नेत्यांनी हातात झाडू घेत स्वच्छतेचा संदेश दिलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विधानसभा राहुल नार्वेकर यांच्यासह इतर नेते, अधिकारी मंडळी विविध भागातील स्वच्छतेच्या या मोहिमेत रमल्याचे पाहायला मिळाले. यावेळी या नेत्यांनी हातात झाडू घेत जनतेला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. मात्र ही स्वच्छता मोहीम सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सार्वजनिक शौचालयाच्या स्वच्छतेच्या मुद्द्यांवरून अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे राहुल नार्वेकर हे देखील विकास कामांच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. दर्जेदार काम होत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. बघा कुठे कोणत्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकर यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच झापलं.

भारतासोबत युद्ध झालं तर अवघ्या 100 तासांत पाकिस्तानचे 5 तुकडे, कारण...

चोरीला गेलेलं बाळ सुखरूप आईच्या कुशीत, पोलिसांकडून 48 तासात शोध अन्...

युद्धाची पूर्व तयारी, गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना आदेश; 7 मे रोजी...

पाक पंतप्रधान गायब, पत्रकाराचा सवाल अन् उपपंतप्रधानांचं उत्तर बघा काय
