‘शिवतीर्था’वरून नरेंद्र मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना….
शिवतीर्थावर महायुतीची आज मुंबईत जाहीर सभा पार पडली. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली. या सभेत भाषण करताना नरेंद्र मोदी यांनी शरद पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि इंडिया आघाडीवर टीकास्त्र डागलं. बघा मोदींनी काय केला हल्लाबोल?
नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना तुम्ही राहुल गांधींना सांगा जीवनभर वीर सावरकरांच्या विरोधात एक शब्द बोलणार नाही असे वधवून घ्या. कारण ते करणार नाही. निवडणुका झाल्यावर ते पुन्हा सावरकरांना शिव्या घालायला सुरुवात करतील. आता निवडणुका आहेत म्हणून त्यांच्या तोंडाला टाळं लागलं आहे, असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली. शिवतीर्थावर महायुतीची आज मुंबईत जाहीर सभा पार पडली. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली. या सभेत भाषण करताना नरेंद्र मोदी यांनी शरद पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि इंडिया आघाडीवर टीकास्त्र डागलं.
वोट बँकेसाठी तुष्टीकरणासाठी मुंबई आणि आघाडीला धोका दिला. या लोकांनी मुंबईत रक्तपात घडवला. त्यांना क्लिनचीट देत आहेत. सर्जिकल स्ट्राईक खोटी आहे म्हणून सांगत आहे. इंडिया आघाडीवाले वारंवार संविधानाचा अपमान करत आहेत. बाबासाहेब धर्माच्या आधारे आरक्षणाच्या विरोधात होते. संविधान सभेने ठरवलं धर्माच्या आधारे आरक्षण न देण्याचा निर्णय घेतला. पण इंडिया आघाडीवाले व्होट जिहाद करणाऱ्यांना धर्माच्या आधारे आरक्षण द्यायला निघाले आहे. आर्टिकल ३७० रद्द करणारा मोदी हा संविधानाचा रक्षक आहे. जे आज संविधान डोक्यावर घेऊन नाचत आहेत, त्यांनी संविधानाचा आत्मा तोडला. संविधानात चित्र होते. पंडीत नेहरूंनी ते चित्रवालं संविधान कपाटात ठेवलं. त्यानंतर त्याची आत्मा काढून टाकली. त्यांनी संविधानाच्या पाठीत खंजीर खुपसलं आहे. मी काँग्रेसला दलित आदिवासींचं आरक्षण काढून घेऊ देणार नाही. हीच वेळ आहे. ही भारताची वेळ आहे. काळाचं चक्र वेगाने फिरत आहे. मुंबईला मतदान करायचं आहे. सर्व रेकॉर्ड तोडायचे आहेत. आपल्या उमेदवारांना विजयी करून दिल्लीत पाठवायचं असल्याचे मोदींनी म्हटले.