आरंभ है प्रचंड! तेलंगणाचं गुलाबी वादळ महाराष्ट्राच्या दिशेने; 400 गाड्यांच्या ताफ्यासह केसीआर माऊलांच्या दर्शनाला
महाराष्ट्रात हातपाय पसरण्याच्या मनसुब्यानं सध्या केसीआर काम करत आहेत. त्याचदरम्यान ते त्यांच्या आमदारांसह 400 वाहणांच्या ताफ्यासह हैद्राबादहून निघालेले आहेत. तर प्रत्येक गाडीवर गुलाबी झेंडा लावल्याने गुलाबी वादळ हे महाराष्ट्राच्या दिशेने येत असल्याचं दिसत आहे.
मुंबई : तेलंगनाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा आज सोलापूर दौरा आहे. त्यादृष्टीने सोलापूरात जंगी तयार करण्यात आली आहे. तर केसीआर हे त्यांच्या आमदारांसह माऊलींचं दर्शन घेणार आहेत. महाराष्ट्रात हातपाय पसरण्याच्या मनसुब्यानं सध्या केसीआर काम करत आहेत. त्याचदरम्यान ते त्यांच्या आमदारांसह 400 वाहणांच्या ताफ्यासह हैद्राबादहून निघालेले आहेत. तर प्रत्येक गाडीवर गुलाबी झेंडा लावल्याने गुलाबी वादळ हे महाराष्ट्राच्या दिशेने येत असल्याचं दिसत आहे. तर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके हे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीत प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासह अजून काही नेत्यांचा देखील पक्षात प्रवेश होण्याची शक्यता आहे.

'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य

प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले

'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य

'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
